असुरक्षित शहारांत मुंबईचा जगात १६वा नंबर!

- Advertisement -

मुंबई: देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई हे असुरक्षित शहरांच्या यादीत जगात अनुक्रमे १८ आणि १६ व्या क्रमांकावर आहेत. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने ‘सेफ सिटीज इंडेक्स २०१७’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार जगातील ६० शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आरोग्य, पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि वैयक्तित सुरक्षितता या मुद्द्यांवरुन जगातील ६० शहरं निवडण्यात आली.  या यादीत असुरक्षिततेत मुंबई १६व्या तर दिल्ली १८ व्या क्रमांकावर आहे.

दुसरीकडे सुरक्षित शहरांमध्ये जपानमधील टोकियो हे अव्वलस्थानी, तर सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे.  सुरक्षित देशांच्या यादीत दिल्ली ४३ व्या तर मुंबई ४५ व्या क्रमांकावर आहे.

कराची सर्वात असुरक्षित!

- Advertisement -

‘सेफ सिटीज इंडेक्स २०१७’ या अहवालात सर्वात शेवटी म्हणजे ६० व्या क्रमांकावर पाकिस्तानातील कराची शहराचा नंबर लागतो. म्हणजेच कराची हे सर्वात असुरक्षित शहर आहे. असुरक्षिततेच्या बाबतीत मुंबई १६ व्या क्रमांकावर तर दिल्ली १८ व्या क्रमांकावर आहे.

२०१५ च्या तुलनेत मुंबईची स्थिती काय?

यापूर्वी इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने २०१५ मध्येही असाच अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यावेळी ५० शहरांची यादी जाहीर केली होती. या यादीत मुंबई ४४ व्या क्रमांकावर होती. आता या यादीत मुंबई ४५ व्या क्रमांकावर आहे.

म्हणजेच दोन वर्षानंतरही मुंबईची परिस्थिती जैसे थेच असल्याचं या अहवालावरुन दिसून येतंय.
सर्वात सुरक्षित देश

टोकियो (जपान)

सिंगापूर

ओसाका (जपान)

टोरंटो (कॅनडा)

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)

43) नवी दिल्ली

45) मुंबई

 

सर्वात असुरक्षित देश

कराची (पाकिस्तान)

यांगोन (म्यानमार)

ढाका (बांगलादेश)

जकार्ता (इंडोनेशिया)

हो ची मिन्ह सिटी  (व्हिएतनाम)

- Advertisement -