Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रअभिनेता सुमीत राघवन यांच्या पत्नीसमोरच हस्तमैथुनाचा प्रयत्न!

अभिनेता सुमीत राघवन यांच्या पत्नीसमोरच हस्तमैथुनाचा प्रयत्न!

मुंबई:  मुंबईत सध्या सार्वजनिक ठिकाणी महिलांसमोर हस्तमैथुन करण्याच्या घटना वाढल्या असून सोमवारी सकाळी अभिनेते सुमीत राघवन यांची पत्नी चिन्मयी सुमीत यांना असाच धक्कादायक अनुभव आला. चिन्मयी सुमीत सोमवारी सकाळी विलेपार्लेजवळच्या पार्लेटिळक शाळेजवळ होत्या. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या बीएमडब्ल्यू कारमधील चालकाने चिन्मयी यांच्या समोरच हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. त्याला मारण्यासाठी चिन्मयी जवळ गेल्या असता त्या चालकाने तेथून पळ काढला.

आरोपीने राखाडी रंगाचा सफारी परिधान केला होता. चिन्मयी यांना कारचा पूर्ण नंबर लिहून घेता आला नाही. १९८५ हे शेवटचे चार डिजिट आहेत. अभिनेते सुमीत राघवन यांनी यासंबंधी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सुमीतने फेसबुक पोस्ट लिहिताना मुंबई पोलिसांना टॅग केले आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या आपला मानूस चित्रपटात सुमीत राघवन मुख्य भूमिकेत आहे. सुमीत यांची पत्नी चिन्मयी सुद्धा अभिनेत्री असून त्यांनी अनेक मराठी नाटक, मालिकांमध्ये काम केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments