सोयाबीन खरेदी प्रकरणी आज महत्त्वाची बैठक

- Advertisement -

मुंबई: राज्यामध्ये सोयाबीन खरेदी आणि त्याचबरोबर ठिकठिकाणी खरेदी केंद्र उघडणे यांसंदर्भात आज एक मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे. सोयाबीन संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट नसल्यामुळे त्यांच्यामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्याच आठवड्यात वर्ध्यातली फक्त ४ सोयाबीन केंद्र सुरू होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर सोयाबीन विकण्यासाठी दारोदारी फिरण्याची वेळ आलीय. याचा फायदा व्यापारी घेता आहेत आणि कवडीमोल दरानं सोयाबीन खरेदी करतायेत. सोयाबीनला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी आज पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत बैठक घेणार आहेत.

- Advertisement -