अनिकेत खून प्रकरण: सांगलीच्या पोलीस अधीक्षक, उपअधीक्षकांची उचलबांगडी

- Advertisement -

सांगली: सांगलीतील अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधीक्षक डॉ. दिपाली काळे यांची गुरुवारी बदली करण्यात आली. शिंदे यांची बदली होण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तविण्यात येत होती. राज्याच्या गृह विभागाने गुरुवारी बदल्यांचे आदेश जारी केले.

दत्तात्रय शिंदे यांच्याकडे राज्य राखीव दलाच्या समादेशकपदाची जबाबदारी देत त्यांची नागपूरला बदली करण्यात आली आहे. उपअधीक्षक पदावर काम करत असलेल्या डॉ. दिपाली काळे यांच्याकडे सोलापूर शहर उपायुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी सुहैल शर्मा यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर उपअधीक्षकपदी अशोक विरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -