Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रअशोक चव्हाण यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांचा राजीनामा मागीतला

अशोक चव्हाण यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांचा राजीनामा मागीतला

मुंबई: आदर्श घोटाळा प्रकरणात खटला चालविण्याचा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा आदेश उच्च न्यायालयानं रद्द केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राजकीय हेतून प्रेरित होऊन निर्णय घेणाऱ्या राज्यपालांनी पदाचा राजीनामा द्यावा,’ अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

आदर्श प्रकरणी न्यायालयानं दिलासा देणारा निर्णय दिल्यानंतर चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. अशोक चव्हाण यांनी यावेळी भाजपवरही टीका केली. ‘मला न्यायव्यवस्थेवर विश्वास होता आणि आज सत्य बाहेर आले. आदर्श घोटाळ्याचे आरोप हे माझ्याविरोधात रचण्यात आलेले राजकीय षडयंत्र होते. आदर्शप्रकरणी राजकीय हेतूने प्रेरित होऊन राज्यपालांनी माझ्याविरोधात चौकशी करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे असा निर्णय घेणाऱ्या राज्यपालांनी राजीनामा द्यायला हवा,’ असं चव्हाण म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments