Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रपंढरपुरात नगरसेवकावर कोयत्याने वार करुन गोळीबार!

पंढरपुरात नगरसेवकावर कोयत्याने वार करुन गोळीबार!

महत्वाचे…
१.पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्टेशनवरील श्रीराम हॉटेलमध्ये ही घटना
२. पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळाले
३. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या तीन टीम रवाना


सोलापूर : पंढरपूर नगरपालिकेतील नगरसेवकर प्राणघातक हल्ला झाला आहे. संदीप पवार असे नगरसेवकाचे नाव आहे. त्यांच्यावर अज्ञाताने गोळीबार केला. पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्टेशन रोडवरील श्रीराम हॉटेलमध्ये ही घटना घडली.

आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नगरसेवक संदीप पवार हे श्रीराम हॉटेलमध्ये आले. त्यावेळी अचानक दोघांनी येऊन त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने वार करुन पळून गेले. अत्यंत रहदारीचा असलेला हा मुख्य मार्ग असून गुढीपाडव्यामुळे हजारो भाविक या परिसरात होते. हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला करुन लगेच पोबारा केला.  पोलिसांच्या मदतीने पवार यांना उपचारासाठी शहरातील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना सोलापूर येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, त्यावरुन ते हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या तीन टीम रवाना झाल्या आहेत. हल्ला केल्यावर तेथून दोन दिशेला मोटारसायकल गेल्याचे समजताच पोलिसांचा त्यादृष्टीने तपास सुरु केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments