Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार

अखेर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार

Shiv Sena's Eknath Shinde likely to be Chief Ministerमुंबई : नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधी प्रस्ताव मान्य झाला. असल्याची माहिती शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मात्र, या महामार्गास दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपाचा प्रस्ताव होता. त्यामुळे या विषयावरून वाद होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं नाव देण्यात यावा असा प्रस्ताव ठेवला. सर्वांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. बाळासाहेबांचं महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाचं योगदान आहे. बाळासाहेबांच्या संकल्पेतून नितीन गडकरींच्या मार्गदनाखाली मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग तयार झाला होता. त्यामुळे गेमचेंजर ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव द्यावं अशी आमची भावना होती, असं शिंदे यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफी देण्यात आली आहे.

या विभागातून जाणार आहे महामार्ग…

१२० मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदननिर्बंध, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या १० जिल्ह्यमंतील २७ तालुक्यांच्या ३५० गावांमधून जाणार आहे.

५६ हजार कोटींचा खर्च…

सुमारे ५६ हजार कोटी रूपये खर्चाच्या आणि मुंबई—नागपूर या शहरांमधील ७१० किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments