पुणे मार्केट यार्डात ८ नोव्हेंबरला पाळणार ‘काळा दिवस’

- Advertisement -

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही पूर्व तयारी न करता ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्याचा व्यापार, उद्योगांवर परिणाम झाला. कष्टकर्‍यांचे आतोनात हाल झाले. आता या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. तरीही अद्याप व्यवहार सुरळीत झालेले नाही. या पार्श्वभूमीवर ८ नोव्हेंबर हा दिवस मार्केट यार्डातील बाजार घटकांच्या विविध संघटनांच्या वतीने काळा दिवसम्हणून पाळण्यात येणार आहे.

मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, हमाल पंचायत, पुणे तोलणार संघटना, महात्मा फुले कामगार संघटना आणि टेम्पो पंचायत या संघटनाच्या सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यावेळी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत कुडले, सरचिटणीस संतोष नांगरे, हमाल पंचायतचे सरचिटणीस नवनाथ बिनवडे, उपाध्यक्ष गोरख मेंगडे, महात्मा फुले कामगार संघटनेचे अध्यक्ष अंकुश हारपुडे, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरघे, हनुमंत बहिरट यांच्यासह मोठ्या संख्येने विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.

- Advertisement -