Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रछगन भुजबळ 'या' कारणामुळे मतदानापासून राहिले वंचित

छगन भुजबळ ‘या’ कारणामुळे मतदानापासून राहिले वंचित

Chhagan Bhujbal
मुंबई : विधानसभेसाठी सोमवारी मतदान झालं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे उमेदवार असून ते स्वत: मतदानापासून वंचित राहिले. त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. मात्र, भुजबळांनी स्पष्ट केले, येवला आणि नाशिकचे अंतर 100 किलोमिटर असल्यामुळे प्रवासात पाच तास गेले असते. त्यामुळे मी मतदानाला गेलो नाही.

भुजबळांनी एका मुलाखतीत सांगितले की, “मी येवल्यात स्वत: निवडणुकीला उभा होतो, नांदगावमधून पंकज भुजबळ उमेदवार होते. तिथून नाशिक 100 किलोमीटरवर आहे. मतदानाला गेले असतो तर पाच तास प्रवासात गेले असते. निवडणूक सुरु असल्याने मतदारसंघामध्ये थांबणेही गरजेचे होते. मतदारसंघ मोठे होते. त्यामुळे मतदानाल जाणं शक्य नव्हतं. त्यामुळेच मी मतदानाला जाऊ शकलो नाही.”

नाशिकच्या पश्चिम मतदारसंघात सिडकोमधील ग्रामोदय मतदान केंद्रावर दरवर्षी भुजबळ कुटुंबीय मतदान करतात आणि त्यानंतर वेगवेगळ्या मतदानसंघामध्ये दौऱ्यावर निघतात. मात्र या वर्षी हे चित्र दिसलं नाही त्यामुळे त्यांच्यावर माध्यमांध्ये मतदानाच्या दिवशी प्रश्न उपस्थितीत करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments