Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रशिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणार्‍या छिंदमचे नगरसेवकपद रद्द!

शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणार्‍या छिंदमचे नगरसेवकपद रद्द!

अहमदनगर- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपदही रद्द करण्यात आले आहे. तसेच त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापालिकेतील महासभेत महापौरांनी मंजूर केला.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर….

महापौरांनी सर्वांती संमती असलेल्या छिंदम यांच्या नगरसेवकपद रद्द करण्याच्या आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. याला भाजप गटनेते बाळासाहेब बोराटे यांनी अनुमोदन दिले.

महापालिकेचे कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी संवाद साधताना छिंदम याने छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्य केले होते. ऑडियो क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. नंतर संपूर्ण महाराष्‍ट्रात‍ संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. चौफेर टीका होत असल्याचे पाहून छिंदम याने जाहीर माफी मागितली होती.

उपमहापौरपदावरून बडतर्फ

श्रीपाद छिंदम याला तडकाफडकी उपमहापौरपदावरून बडतर्फ करण्यात आले होते. तसेच भाजपने ही त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती. दरम्यान, याआधी छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असा ठराव २२ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments