Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रआता महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात ‘मुख्यमंत्री’ कार्यालय!

आता महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात ‘मुख्यमंत्री’ कार्यालय!

मुंबई : राज्यातील नागरिकांना कामासाठी आता मुंबई मंत्रालयात येण्याची गरज नाही. कारण, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात एक मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्याची घोषणा आज मंगळवारी केली आहे. यामुळे नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे.

महाराष्ट्रातील जनतेला कामानिमित्त मुंबई येथे मंत्रालयात कामासाठी हेलपाटे मारावे लागत होते. त्यामुळे पैसा आणि प्रचंड वेळ यामध्ये जात होता. मुंबई मंत्रालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. ही गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी सरकारने त्यादृष्टीकोनातूनच  हे पाऊलं उचलले आहेत.

मंत्रालयात ब-याच वेळी एकाच वेळी काम होत नाहीत. कधी कागदपत्रांमध्ये त्रुटी असतात, तर कधी अधिका-यांचा, संबंधित मंत्र्यांच्या सह्या होत नाही. त्यामुळे कामं रखडली जातातं. यावेळी नागरिकांचा चांगलाच मनस्ताप होतो. अशावेळी आत्महत्येसारखे प्रकार मंत्रालयात घडत असतात. या सर्व गोष्टींचा विचार करता सरकारने ही पाऊले उचलली आहेत. त्यामुळे सर्वस्तरातून याचं स्वागत होतं आहे.

महाराष्ट्रातील या विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरु होणार….

  • प्रशासकीय विभाग  विभागातील जिल्हे
  • कोकण  मुंबई, उपनगर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  • नाशिक  नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार
  • औरंगाबाद  औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, बीड, जालना व हिंगोली
  • पुणे विभाग  कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सातारा व सांगली
  • नागपूर  अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ व वाशिम
  • अमरावती विभाग  भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा व गोंदिया
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments