Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रआपले मतदान केंद्र शोधण्यासाठी 'या' लिंकवर क्लिक करा !

आपले मतदान केंद्र शोधण्यासाठी ‘या’ लिंकवर क्लिक करा !

maharashtra assembly election
विधानसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी मतदान होत आहे. विधानसभेच्या २८८ जागांसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्र कोणते आहे, ते शोधण्यासाठी निवडणूक आयोगाने खाली जे संकेतस्थळ दिले त्यावरून आपण मतदान केंद्र शोधू शकतो.

विधानसभेसाठी मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. मतदानापूर्वी मतदान केंद्र कोणता या बाबत गोंधळ काही मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होतो. मतदानाचा अधिकार बजावताना मतदान केंद्राची माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर तुमचं मतदान केंद्र माहित नसेल तर एका एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. आयोगाच्या https://electoralsearch.in आणि http://103.23.150.139/marathi/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर स्वत:ची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो.

माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.

मतदानासाठी हे आवश्यक ओळखपत्र

मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबूक, पॅनकार्ड , राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड

मतदान करताना सात सेकंद महत्वाचे…

विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएमसोबत अत्याधुनिक व्हीव्हीपॅट जोडलं असतं. व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतदाराने दिलेल्या उमेदवाराला मत नोंदविले गेल्याबद्दल खात्री करून घेता येते. मतदान केल्यानंतर ज्याला मतदान केलं. त्याच चिन्हाची चिठ्ठी सात सेकंद व्हीव्हीपॅटवर दिसते. त्यानंतर ही चिठ्ठी व्हीव्हीपॅटमध्ये पडते. त्यामुळे आपलं मत बरोबर पडलं की नाही याचीही खात्री करून घेता येते. त्यामुळे ते सात सेकंद महत्वाचे असतात

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments