Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोना : सोलापूरसह मिरज, धुळे औरंगाबादमध्ये लॅब सुरु करणार - आरोग्यमंत्री

कोरोना : सोलापूरसह मिरज, धुळे औरंगाबादमध्ये लॅब सुरु करणार – आरोग्यमंत्री

Rajesh Tope,Rajesh, Tope,Marathwada,Maharashtra, Cabinet,Expansionमुंबई : जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. भारतात सर्वात जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबईच्या कस्तूरबा रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात सोलापूरसह, मिरज,धुळे,औरंगाबादमध्ये नवीन लॅब सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कस्तूरबा हॉस्पीटलमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.

Today i have visited Seven Hill Hospital in Mumbai to inquire about passengers arriving here from seven countries. I have discussed with doctors about available #coronavirus quarantine facilities. #covid19 @drharshvardhan pic.twitter.com/mTQc1Y1S8v

महाराष्ट्रात कोरोना ग्रस्त ३२ रुग्ण असून कोरोनाच्या मुकाबला करण्यासाठी राज्यशासनाने पुढाकार घेतला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज रविवारी कस्तुरबा हॉस्पीटलमध्ये जाऊन कोरोनाग्रस्त रुग्णांची पाहणी केली. तेथे त्यांना सुविधा मिळत आहे का याची चौकशी केली. जलद गतीनं रिपोर्ट मिळावा यासाठी नवीन लॅब सुरु करण्यात येत आहे. सेव्हन हिल रुग्णालयात १ हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. रुग्णांना जेवण वायफाय सुविधांची पाहणी केली आहे. रुग्ण पळून जाऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. तसेच कोरोनाबाबत अफवा पसरवणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments