मनसे पदाधिकाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा

- Advertisement -

पुणे : फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात फेरीवाल्यांविरोधात मनसेने राजाराम पुलाजवळ आंदोलन केले होते. त्याचसोबत, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील हल्ल्याप्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनलाही मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

मुंबईतही मनसेचं आंदोलन

मुंबईत मनसेने फेरीवल्यांविरोधात मोठं आंदोलन केलं. त्यात मालाडमधील मनसेचे विभागप्रमुख सुशांत माळवदेंना फेरीवाल्यांनी मारहाण केल्यानंतर मनसे आणखी आक्रमक झाली आणि अनेक ठिकाणी तोडफोडही केली.

- Advertisement -