Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादइमारतीवरून उडी मारलेल्या ‘त्या’ विद्यार्थ्याचा पहाटे मृत्यू!

इमारतीवरून उडी मारलेल्या ‘त्या’ विद्यार्थ्याचा पहाटे मृत्यू!

student death

औरंगाबाद: एम.आय.टी महाविद्यालयात बीएससी नर्सिंगमध्ये शिक्षण घेत असलेल्या सचिन वाघ या विद्यार्थ्याला मंगळवारी १० मार्च रोजी परीक्षेत कॉपी  करताना पकडले होते. सचिनने पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर त्याला एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारसाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक होती. मात्र आज पहाटे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.   

हे आहे प्रकरण….
हर्सूल भागात राहणारा सचिन हा एम.आय.टीच्या नर्सिंग महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. सध्या सचिनच्या महाविद्यालयीन परीक्षा सुरु आहेत. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास न्यूट्रीशन बायोकेमेस्ट्रीची परीक्षा सुरु असताना त्याला कॉपी करताना पकडण्यात आले. पर्यवेक्षकाने त्याला पुढील कारवाईसाठी प्राचार्याकडे नेले.

घरच्या भीतीमुळे उचलले पाऊल
कॉपी सापडल्याने महाविद्यालयाने केलेल्या कारवाईमुळे घरच्या मंडळींना कसे सामोरे जावे या द्वंद्वात अडकलेल्या सचिनने काही मिनिटांत महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील जिन्यातील काचेचे तावदान हटवून त्यातून खाली उडी घेतली. उडी मारण्यापूर्वी त्याने एमआयटीतच शिक्षण घेत असलेला मित्र सौरभ रणदिवे याला मोबाईलवरून संपर्क साधला; परंतु सौरभचीही परीक्षा चालू असल्याने त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे सचिनने घराजवळील मित्र शुभम राठोडला फोन करून, तो आत्महत्या करीत असल्याचे सांगितले.

सचिन व शुभम या दोन्ही मित्रांचे वारंवार फोन येत असल्याने सौरभने फोन उचलला अन् पेपर अर्ध्यावर सोडून त्याच्या कॉलेजच्या दिशेने धाव घेतली. समोरचे चित्र पाहून सौरभ थबकला. महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून सचिन खिडकीतून उडी मारण्याच्या तयारीत होता. ‘नको नको असे करू नकोस,’ आरडाओरड झाला. जिन्याने पळत जाऊन त्याला रोखेपर्यंत त्याने उडी मारली होती.

सर्वत्र हळहळ….. 

सचिनचे वडील पुणे येथे बस कंडक्टर आहेत. नवनाथनगरात मोठी बहीण,भाऊ, आई राहतात. ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सचिनने चुकीचे पाऊल उचलल्यामुळे त्याच्या मित्रांमध्ये आणि महाविद्यालयात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments