गायकवाड परिवाराची रुग्णसेवा सदन, लातूर ला ५ लक्ष रु ची देणगी

- Advertisement -

रुग्ण सेवा सदन साठी माजी खासदार डॉ सुनील गायकवाड व महाराष्ट्र बांधकाम विभागाचे सचिव श्री अनिल गायकवाड यांच्या वतीने वडिल स्व . बळीरामदादा गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त रुग्णसेवा सदन च्या एक खोलीची देणगी पद्मभूषण डॉ अशोकराव कुकडे काका यांना देणगी देण्यात आली.

कर्करोग रुग्णांना लातुरात मिळत असलेले योग्य उपचार मुळे धोका कमी झाला असला तरी रुग्णाची वाढती संख्या चिंताजनक आहे. या रुग्णांची विवेकानंद कँसर हॉस्पिटलमध्ये रेडिएशन व केमोथेरपी सोय आहे त्यासाठी रुग्णांना साधारण ८ ते ३० दिवस दररोज उपचारासाठी एक तासासाठी यावे लागते.

असे १०० च्या वर दररोज रुग्ण उपचारासाठी येत आहेत. या रुग्णांची ये जा करण्यात होणारी हेळसांड थांबवण्यासाठी लातूरचे सुपुत्र व टाटा कँसर हॉस्पिटल चे संचालक मा डॉ कैलासजी शर्मा यांनी कृषिभूषण श्री बी बी ठोंबरे यांच्या कडे मांडला व त्यांनी जलयुक्त लातूर च्या टीम समोर मांडला व एक भव्य “रुग्णसेवा सदन” लोकसहभागातून बांधण्याचा संकल्प केला , विवेकानंद रुग्णालयाच्या अंतर्गतच रुग्णसेवा सदन समिती च्या माध्यमातून हे कार्य चालू असून १०० रुग्ण व प्रत्येकी एक नातेवाईक यांची निवास व भोजन व्यवस्था नाममात्र दरात करण्यात येणार आहे .

- Advertisement -

यासाठी MIDC येथील विवेकानंद कँसर हॉस्पिटल शेजारी दोन एकर जागा MIDC कडून घेतली असून ,या प्रकल्पासाठी अंदाजे ९ कोटी रु खर्च येणार असून हा सर्व निधी लोकसहभागातून उभारला जाणार आहे . समाजातून यासाठी उत्तम प्रतिसाद मिळत असून बांधकाम ही प्रगती पथावर आहे .

सध्या अशी व्यवस्था ११ रुग्णाची एका छोटया इमारतीत चालू आहे. आज प. पु . स्व . बळीरामदादा शिवराम गायकवाड यांच्या नव्वदाव्या जयंतीनिमित्त , चैत्यस्तुप ,कळंब रोड हरंगुल येथे त्यांच्या स्मरणार्थ लातूरचे माजी खासदार डॉ सुनील गायकवाड व महाराष्ट्र राज्य बांधकाम विभागाचे सचिव श्री अनिल गायकवाड यांनी. रुग्णसेवा सदन चे प्रकल्प समन्वयक पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे काका यांच्याकडे पाच लक्ष रुपयाचा धनादेश दिला , यावेळी मा ना संजय बनसोडे साहेब , सा बांधकाम राज्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य , संवेदना प्रकल्पाचे श्री सुरेश पाटील , नगरसेवक देविदास काळे,रुग्णसेवा सदन चे सहसचिव श्री शिवदास मिटकरी , वेंकट लामजने ,गायकवाड कुटुंबीय व नातेवाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here