Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रयुती सरकारच्या काळात १६ हजार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले - शरद पवार

युती सरकारच्या काळात १६ हजार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले – शरद पवार

मानोरा: भाजप-सेना युती सरकारच्या सत्ताकाळात राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मानोरा येथे बुधवारी केली.

पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. मानोरा येथे आयोजित सभेत शरद पवार यांनी राज्य सरकारच्या धोरणावर टिका केली. ते म्हणाले की, शेतकरी विविध संकटानी घेरला असताना राज्यशासन मात्र मागील पाच वर्षात केलेल्या कायार्चा खोटा लेखाजोखा जनतेसमोर मांडत फिरत आहे. या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांमध्ये आघाडीवर असून, गेल्या पाच वर्षात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही बाब केंद्र सरकारने ऊघड केलेल्या आकडेवारीवरूनच स्पष्ट झाली आहे.

शेतकºयांना सरसकट कर्जमाफी दिल्याचा गवगवा राज्य सरकार करीत आहे , पण प्रत्यक्षात एकूण कर्जदार शेतकºयांपैकी केवळ ३१ टक्के शेतकºयांनाच कर्जमाफी मिळाली. शेतकरी कर्जात बुडत असताना देशाच्या सरकारने ऊद्योगासाठी ८० हजार कोटीची तरतूद करण्याचे ठरविले आहे. सरकारने नोटबंदीच्या माघ्यमातून काळापैसा बाहेर काढण्याचे आश्वासन दिले; परंतु देशातील चलनात असलेल्या ९१ लाख कोटीच्या चलनाशिवाय काहीच बाहेत आले नाही, असेही पवार म्हणाले. त्या शिवाय या सरकाच्या काळात ऊद्येगधंदे बंद पडले बेरोजगारी वाढली, महिला अत्याचारातही वाढ झाली. असा हल्लाबोल पवारांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments