Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रदिल्लीत डेरा आंदोलन करणार; राज्यमंत्री बच्चू कडू यांचा इशारा

दिल्लीत डेरा आंदोलन करणार; राज्यमंत्री बच्चू कडू यांचा इशारा

मुंबई l मागील चार दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर  शेतक-यांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे. यावरून विरोधी पक्ष काँग्रेसकडून मोदी सरकारवर निशाणा साधला जात असताना, आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील, ‘चलो दिल्ली’चा नारा देत केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

“चलो दिल्ली…केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा. ३ दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार.” असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ट्विट केलं आहे.

संसदेत कायदे मंजूर केल्यापासून शेतकरी राज्यांमध्येच आंदोलन करत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली होती. दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून सीमेवरच रोखण्यात आलं असून, दिल्लीत जाण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.

तर, “शेतकऱ्यांवर दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. खून, हत्या करण्याचे प्रयत्न असे आरोप आहेत. त्याच वेळी वृद्ध-जर्जर अशा अन्नदात्या शेतकऱ्यांवर काठ्या उगारतानाचे, त्यांना रक्तबंबाळ करतानाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत.

 हे पाहून सरदार पटेल यांचा भव्य पुतळा अहमदाबादेत खरेच अश्रू ढाळत असेल. तेही सरदारच होते. शीख बांधवांनाही ‘सरदार’ म्हणूनच संबोधले जाते. सरदारांवर अन्याय तेव्हाही झाला व आजही होतच आहे.

इकडे आपल्याच शेतकऱ्यांना दिल्लीत घुसू दिले जात नाही आणि तिकडे सीमेवर चीनचे सैन्य आमच्या हद्दीत घुसले व ठाण मांडून बसले आहे. शेतकऱ्यांवर जे फवारे मारले जात आहेत.

अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडून शेतकऱ्यांना मारले जात आहे, तसा बलप्रयोग लडाख किंवा जम्मू-कश्मीरात होऊ नये याचे आश्चर्यच वाटते.” असं सामनाच्या अग्रलेखाद्वारे म्हणत शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments