मोदींविरोधात सर्वांनी एकत्र यावे असे मीच पहिल्यांदा म्हणालो होतो- राज ठाकरें

- Advertisement -

रत्नागिरी: पाडव्याच्या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरे म्हणाले होते कि सर्व पक्षांनी एकत्र यायची वेळ आली आहे. भारताला आता तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे, अस म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारविरोधात देशातील सर्व पक्षांनी व नेत्यांनी आपापले मतभेद विसरून एकत्र यावे असे मीच पहिल्यांदा म्हणालो होतो, असे सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मोदीविरोधात विरोधक एकत्र होणाच्या घटनेचे श्रेय घेतले.

राज ठाकरे सध्या कोकण दौ-यावर आहेत. आज ते रत्नागिरीत आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना वरील वक्तव्य केले. कर्नाटक निकालानंतर मोदीं विरोधात जे सगळे विरोधक एकत्र आलेत याचा गिअर मी पहिल्यांदा टाकला आणि मगच आता सगळे विरोधक एकत्र आल्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

राज ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारचे धोरणे योग्य नाहीत. मोदी एककल्ली कारभार करत आहेत. त्यामुळेच भाजप सरकार हटवले पाहिजे असे माझे म्हणणे आहे. देशातील विरोधकांनी आपापले मतभेद विसरून एकत्र व्हावे असे त्यामुळेच मी म्हणालो होतो. आज ते घडताना दिसत आहे. विरोधकांनी एकत्र व्हावे यासाठी खरा मीच पहिला गियर टाकला होता असे सांगत राज यांनी सध्या मोदीविरोधात एकवटलेल्या विरोधकांच्या एकीचे श्रेय घेतले.

नाणार प्रकल्पाची आवश्यकता कोकणात नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनेवर टीका करताना राज ठाकरे म्हणासे, अधीसूचना रद्द झाल्याची शिवसेना खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत आहे. अशा खोट बोलणाऱ्यांचे तरी आता काय करायचे असेही ते म्हणाले.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here