Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रवंचितच्या उमेदवाराचा आगळावेगळा वचननामा प्रसिद्ध !

वंचितच्या उमेदवाराचा आगळावेगळा वचननामा प्रसिद्ध !

kiran kale VBA ahmadnagar Manifesto
राज्यातील प्रमुख पक्षांनी आपापले जाहीरनामे, वचननामे, शपथनामे, संकल्पनामे जाहीर करायला सुरुवात केली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार किरण काळे यांनी वैयक्तिक वचननामा जाहीर करुन अजब दावा केला. त्यामध्ये त्याने दिलेले वचन चर्चेचा विषय बनला.

किरण काळे हे अहमदनगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून अनिल राठोड तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संग्राम जगताप हे दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत. असं असलं तरी काळे यांनी आपल्या खास प्रचार पद्धतीनं त्यांना जेरीस आणलं आहे. काळे यांनी अहमदनगर मधील मतदारांसाठी स्वत:चा स्वतंत्र वचननामा जाहीर केला आहे. हा वचननामा म्हणजे कुठल्याही आश्वासनांचा पाढा नसून तो प्रतिस्पर्धी उमेदवारांची ‘कुंडली’ लोकांपुढं मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

उमेदवाराचा वचननामा…

मी गुंडगिरी करणार नाही.

मी कोणाचे खून करणार नाही.

मी कुठल्याही अधिकाऱ्याला चप्पल फेकून मारणार नाही.

कधीही पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणार नाही.

पत्रकारांना मारहाण करून दहशत माजवणार नाही.

कधीही कुणाची कष्टाची प्रॉपर्टी बळकावणार नाही.

अहमदनगरमधील व्यापाऱ्यांना धमकावणार नाही.

राजकीय स्वार्थासाठी जातीय दंगली भडकवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार नाही.

प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून भ्रष्टाचार करणार नाही.

एमआयडीसीतील उद्योजकांकडे खंडणी मागून त्यांना वेठीस धरणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments