Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रअनिकेत कोथळेच्या मुलीला दत्तक घेण्यासाठी हिंगोलीच्या डीवायएसपींचा पुढाकार!

अनिकेत कोथळेच्या मुलीला दत्तक घेण्यासाठी हिंगोलीच्या डीवायएसपींचा पुढाकार!

सांगली:  अनिकेत कोथळेच्या वर्षाच्या मुलीला दत्तक  घेण्यासाठी आपण  तयार असल्याची माहिती हिंगोलीच्या डीवायएसपी सुजाता पाटील यांनी दिली आहे. तसा अर्जही त्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केला आहे.

मृत अनिकेत कोथळेची मुलगी तीन वर्षांचीच  असून तिचं नाव प्रांजल आहे. तिच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतचा सर्व खर्च करण्याची तयारी सुजाता पाटील यांनी दाखवली आहे. अनिकेत कोथळेचा मृत्यू सांगलीतील पोलीस कोठडीत झाला होता.

अनिकेत कोथळेवर चोरीचा आरोप लावून पोलिसांनी गेल्या महिन्यात त्याला अटक केली होती आणि कोठडीत त्याला जबर मारहाण केली होती त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांचा क्रूरपणा इथेच थांबला नाही, तर त्याचा मृतदेह अंबोली घाटात नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मृतदेह जळत नाही हे पाहिल्यावर परत दुसऱ्यांदा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. याप्रकरणी अनेक पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. तसंच  अनिकेत कोथळे याचा खटला विशेष सरकारी वकील उज्जवल निकस लढवणार आहेत

कोण आहेत सुजाता पाटील?

-आता हिंगोलीच्या डीवायएसपी

– ११ ऑगस्टच्या आझाद मैदान दंगलीविरोधात पोलीस प्रकाशनात कविता लिहून ठरल्या होत्या वादग्रस्त

-त्या काव्यलेखनामुळे वरिष्ठांची नाराजी ओढावली तर शिवसेनेने सुजाता पाटील यांची पाठराखण केली.

-ट्रॅफिक पोलीसदलात काम करतानाही त्यांच्या कारवाया लक्षवेधी ठरल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments