उभ्या कंटेनरला तवेरा धडकल्याने आयकर अधिकारी ठार

- Advertisement -

महत्वाचे….
१. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर झाला अपघात २. उभ्या कंटेनरवर मागून तवेरा धडकली ३ आयकर अधिकारी मुंबईहून पुण्याकडे जात होते


पिंपरी-चिंचवड: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव तवेरा गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडक दिल्याने एक जण ठार तर तिघे जखमी झाले. ही घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली असून मृत व जखमी हे आयकर अधिकारी असल्याचे सांगण्यात येते. हा अपघात देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरजाई मंदिराजवळ झाला.

अधिक माहिती अशी, आयकर विभागाचे काही अधिकारी कामानिमित्त मुंबईहून पुण्याकडे तवेरा गाडीतून (एमएच १२ एफसी २६१५) येत होते. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अमरजाई मंदिराजवळ लोखंडाचे खांब घेऊन जात असलेला कंटेनर (एमएच ०६ के ७९४४) उभा होता. तवेरा चालकाला याचा अंदाज आला नाही. भरधाव असलेल्या तवेराने त्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह तिघे जखमी झाले. अभिषेक त्यागी असे मृताचे नाव असून ते आयकर विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत होते, असे सांगण्यात येते. तर उपसंचालक आनंद उपाध्याय, कृष्णकांत मिश्रा व चालक गंभीर जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

- Advertisement -
- Advertisement -