Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रनुतन वर्षाच्या धांगडधिंग्याला महागाईचा फटका

नुतन वर्षाच्या धांगडधिंग्याला महागाईचा फटका

मुंबई – बियरच्या फेसाळणाऱ्या घोटासोबत नूतन वर्षाचे स्वागत करून धांगडधिंगा करु इच्छिणाऱ्यांना महागाईचा फटका बसणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने बियरच्या किमतीत १५ ते २० रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने आता बियरच्या किमती वाढणार आहेत. यामुळे नववर्षाच्या स्वागतालाही माहागाईचे ग्रहण लागणार आहे.

बियर दरवाढीमुळे सरकारी महसुलात ७५ कोटींची वाढ होणार आहे. उत्पादन शुल्क विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे मद्यपींना ३१ डिसेंबरच्या रात्री बियरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. बियरच्या ६५० एमएलच्या एका बाटलीवर ३५ ते ४० रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव उत्पादन शुल्क विभागाचा होता. मात्र सरकारने बियरवर १५ ते २० रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.
महाराष्ट्रात वार्षिक ३३ कोटी लिटर बियरची विक्री होते. मागच्या वर्षी या विक्रीतून उत्पादन शुल्क विभागाने १२ हजार २८८  कोटींचा महसूल मिळवला. यावर्षी १४ हजार कोटींचा महसूल मिळवण्याचे उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष्य आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments