Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रइंस्टाग्राम लाईव्हने पुण्यात घेतला एका तरुणाचा बळी एक गंभीर जखमी

इंस्टाग्राम लाईव्हने पुण्यात घेतला एका तरुणाचा बळी एक गंभीर जखमी

पुणे: सध्या सोशल मीडियावर कोणी फोटो टाकतो कोणी व्हीडीओ टाकतो तर कोणी लाईव्ह व्हीडीओ अपलोड करत असतो, हा नवा ट्रेंडच आला आहे. या लाईव्ह व्हीडीओनेच एका तरुणाचा बळी घेतला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी (१३ मे) पहाटे पाच वाजता हा अपघात झाला. भरधाव वेगात कार पळवून इंस्टाग्रामवर लाईव्ह करणे हे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे.

इंस्टाग्राम लाईव्ह करताना कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात शुभम प्रकाश जाधव (वय-२१, रा. मुंबई) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र ऋषिकेश पवार हा गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याची मृत्युशी झुंज सुरु असल्याचे समजते.

शुभम आणि ऋषिकेश हे दोघे निगडीहून खराडवाडीकडे जात होते. शुभम कार चालवत होता. शुभम हा भरधाव कार चालवत असताना ऋषिकेश त्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर लाईव्ह करत होतो. शुभमने गाडीचा वेग ताशी १२० ते १४० किमीवर नेला. परंतु मोरवाडी ग्रेटसेपरेटरमध्ये त्याचा कारवरील ताबा सुटला आणि कार दुभाजकाला धडकली. कार चक्काचूर झाली. यात शुभम जाधव याचा जागेवरच मृत्यू झाला तर ऋषिकेश हा गंभीर झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी घेतली. शुभव आणि ऋषिकेशला कारचा दरवाजा कापून बाहेर काढण्यात आले.

शुभम मामाकडे आला होता…
शुभम हा एकुलता एक मुलगा होता. काही महिन्यापूर्वीच त्याचे वडीलाचे निधन झाले होते. शुभम हा ऋषिकेशचा आतेभाऊ होता. दोघे पिंपरी चिंचवडला मामाच्या घरी आले होते. मामाच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करून रविवारी सकाळी तो निगडी येथे राहणाऱ्या बहिणाला भेटायला गेला. शुभमच्या मामाने त्याला दुचाकी की चावी दिली, मात्र शुभमने दुचाकी न नेता चारचाकी घेऊन गेला. बहिणीला भेटून परत मामाच्या घरी येत ही भीषण अपघात झाला. या घटनेमुळे खराडवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments