Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्र‘दिलखुलास’कार्यक्रमात सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची मुलाखत

‘दिलखुलास’कार्यक्रमात सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची मुलाखत

मुंबई:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘सहकाराचे बळकटीकरण’ या विषयावर सहकार आणि पणन मंत्री श्री.बाळासाहेब पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून  गुरूवार दिनांक ५ व शुक्रवार दि. ६  नोव्हेंबर रोजी  सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीत कोविडच्या कालावधीत सहकार विभागामार्फत घेण्यात आलेले निर्णय, टाळेबंदी कालावधीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत मुंबई व पुणे येथे थेट भाजीपाला विक्रीसंदर्भातील निर्णय, आंतरराज्य फळे व भाजीपाला वाहतूक नियंत्रण, कोरोना काळात सहकारी संस्थासाठी घेण्यात आलेले निर्णय, उडीद, मुग, सोयाबीन, कापूस व गाळप हंगाम या पिकांच्या संदर्भातील हमी भावासंदर्भातील निर्णय, साखर उद्योगासाठी आत्मनिर्भर योजना, कोविड आजार  नियंत्रणासाठी सातारा जिल्ह्यात राबविण्यात आलेले उपक्रम या संदर्भात सविस्तर माहिती  ‘दिलखुलास’ कार्यक्रमात सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments