Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादजालना: भोकरदन-जाफ्राबाद मार्गावर भरधाव टेम्पोने दुचाकीस्वाराला चिरडले

जालना: भोकरदन-जाफ्राबाद मार्गावर भरधाव टेम्पोने दुचाकीस्वाराला चिरडले

जालना: भोकरदन-जाफ्राबाद कापसाने भरलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली.    मुख्य रस्त्यावरील विरेगाव गावाजवळ टेम्पोने दुचाकीस्वाराला चिरडले. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (गुरुवार) सकाळी सातच्या सुमारास घडली. सागर वाघमारे (रा.सागवण, बुलडाणा) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

टेंभुर्णी (ता.जाफ्राबाद) येथून कापूस खरेदी करून भोकरदनकडे भरधाव जाणार्‍या टेम्पोने भोकरदनहून बुलडाण्याकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर टेम्पो रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले. या अपघातातील जखमीला नागरिकांनी तत्काळ भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर मार असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments