Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeकोंकणठाणे'महा' चक्रीवादळाचा पालघर, ठाणेसह राज्याला धोका!

‘महा’ चक्रीवादळाचा पालघर, ठाणेसह राज्याला धोका!

अरबी समुद्रात ‘महा’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. पालघर, ठाणे, रायगडसह राज्यातील काही भागात बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता आहे. गरज नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

उद्या ६ नोव्हेंबरच्या रात्री किंवा ७ नोव्हेंबरला पहाटे ‘महा’ चक्रीवादळ गुजरातच्या पोरबंदर आणि दीव दरम्यान समुद्र किनाऱ्यावर धडकणार आहे. या ठिकाणी १०० ते १२० प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातला धडकणाऱ्या या वादळाचा फटका महाराष्ट्रातील ठाणे आणि पालघर जिल्ह्याला मोठा फटका बसणार आहे. ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी या दोन्ही जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

येथेही मुसळधार कोसळणार…

रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि सातारा, उद्या ६ नोव्हेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद येथेही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूर आणि नाशिकमध्ये ७ नोव्हेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सर्व यंत्रणा सज्ज…

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणाऱ्या सर्व संबधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. पालिका, महसूल, आरोग्य, वैद्यकीय पथक, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर सर्व यंत्रणाच्या अधिकारी- कर्मचारी वर्गाने मुख्यालयात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रजेवर असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून तातडीने कामावर हजर होण्याचे सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments