Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणCOVID-19: घरोघरी ताप सर्वेक्षण आणि कॅान्टॅक्ट ट्रेसिंगला प्राधान्य द्या: ठाणे आयुक्तांच्या सूचना

COVID-19: घरोघरी ताप सर्वेक्षण आणि कॅान्टॅक्ट ट्रेसिंगला प्राधान्य द्या: ठाणे आयुक्तांच्या सूचना

thane, municipal commissioner, contact tracingठाणे: घरोघरी ताप सर्वेक्षण प्रभावीपणे करण्याबरोबरच कॅान्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिल्या. दरम्यान मालेगावमध्ये यशस्वीपणे काम करणारे सनदी अधिकारी पकंज आशिया यांनी मालेगावमध्ये कशा प्रकारे काम केले याची माहिती या बैठकीत दिली. यावेळी सनदी अधिकारी आणि कोव्हीडसाठी नियुक्त विशेष अधिकारी रंजीत कुमार हेही उपस्थित होते.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरोघरी प्लस ॲाक्सीमीटर आणि थर्मल स्कॅनरच्या माध्यमातून ताप सर्वेक्षण प्रभावीपणे करण्याची गरज असून त्यामधून तापसदृष्य किंवा कोरोना सदृष्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना तात्काळ क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलातंरित करण्यात यावे असे सांगून फिव्हर ओपीडीसह कॅान्टॅक्ट ट्रेसींगला प्राधान्य देण्यात यावे असे सांगितले.

मिशन बिगिन अगेन अंतर्गत बाजारपेठा उघडण्यात आल्या असून पी1, पी2 प्रमाणे कार्यवाही होते की नाही याची पोलिसांशी समन्वय साधून त्याची प्रभावीपणे अंमलबजाणी करावी अशा सूचना दिल्या. दरम्यान प्रभाग समितीतंर्गत महापालिकेच्या शाळा असतील तर त्या क्वारंटाईन सेंटर्ससाठी वापरण्यात याव्यात अशा सूचनाही महापालिका आयुक्त श्री. सिंघल यांनी या बैठकीत दिल्या.

यावेळी मालेगावमध्ये यशस्वीपणे काम करणारे सनदी अधिकारी पंकज आशिया यांनी तेथे कशा प्रकारे काम केले याची माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments