Saturday, April 27, 2024
Homeकोंकणठाणेगुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भाविकांसाठी आयुर्वेदिक चिकित्सा शिबीराचे आयोजन

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भाविकांसाठी आयुर्वेदिक चिकित्सा शिबीराचे आयोजन

ठाणे : श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज सेवा संस्था ,ठाणे यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भाविकांसाठी आयुर्वेदिक चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते.

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज सेवा संस्था ,ठाणे त्यांच्या वतीने ठाण्यातील पाचपाखाडी नामदेववाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात मंगळवारी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त आयुर्वेदिक चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते याच्या उदघाटन प्रसंगी मठाचे संस्थापक अनिल बोर्डे,खजिनदार अनघा बोर्डे-पवार,कार्याध्यक्ष सुभाष चव्हाण,गणेश बनोटे,संतोष पवार,मंगेश रांगळे आदी सह मान्यवर उपस्थित होते. या आयुर्वेदिक चिकित्सा शिबीरामध्ये क्यूआरएमए (QRMA) मशीनद्वारे केवळ ९९ रुपयात संपूर्ण बॉडी चेक करण्यात आले.यामध्ये ऍलर्जी,शाररिक गुणवत्ता,ब्लड शुगर,अस्थिरोग,मेंदूचे कार्य,हृदयाचे कार्य,अन्नाशयचे कार्य,मूत्रपिंडाचे कार्य,फुफुसाचे कार्य,लठ्ठपणा,हृदय व मेंदूच्या नाडीचे कार्य,मासिक पाळी,स्तनाचे विकार आदी सह एकूण ३८ चाचण्या या मशीनद्वारे करण्यात आल्या .या शिबिराचा स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. टॉपटाईम फार्म यांचे या शिबिराला विशेष सहकार्य लाभले.

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज सेवा संस्था यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी मठात अभिषेक,स्वामी चरित्र वाचन,भजन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी दर्शनासाठी मठात गर्दी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments