Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeकोंकणठाणेशिवसेनेचे नरेश म्हस्के ठाणे मनपाचे महापौर

शिवसेनेचे नरेश म्हस्के ठाणे मनपाचे महापौर

Naresh Mhaske and Pallavi Kadam Thane Municipal Corporationठाणे : ठाणे महापालिकेत शिवसेनेचे नरेश म्हस्के महापौरपदी आणि पल्लवी कदम यांची उपमहापैरपदी बिनविरोध निवड झाली आहे. याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज गुरुवारी ठाण्यात जाऊन नगरसेवक आणि नवनिर्वाचित महापौरांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंचे यावेळी शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले.

यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीय नगरसेवकांचे आभार मानले. आज ठाणे महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदासाठी एकमताने मंजुरी दिली. सेना नेते एकनाथ शिंदे यांनी सभागृहात येऊन नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांचा सत्कार केला. एकनाथ शिंदेंच्या विनंतीवरुन राष्ट्रवादीने ठाणे महापालिका महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. त्यामुळे ठाणे महापालिकेत महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचाच असेल हे आधीच सिद्ध झाले होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments