Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeकोंकणठाणेविटाव्यातील सुष्मिता देशमुखने केरळातील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पटकावले रौप्य

विटाव्यातील सुष्मिता देशमुखने केरळातील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पटकावले रौप्य

कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी होणार सुष्मिताची निवड आतापर्यंत पाच सुवर्णसह 32 पदकांची मानकरी प्रतिनिधी

Sushmita Deshmukh, Sushmita Deshmukh win powerlifting tournamentठाणे : ठाण्यातील विटाव्यात राहणारी सुष्मिता सुनिल देशमुखने 17 जून रोजी केरळमध्ये पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 47 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकून दुसरं स्थान पटकावलं आहे. तर आगामी कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी सुष्मिताची निवड भारतीय संघात होणार आहे. विशेष म्हणजे सुष्मिताने आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पॉवरलिफ्टिंग स्पर्धांमध्ये 5 सूवर्ण पदकासह 32 पदकांची कमाई केली आहे. तिच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, आयटी क्षेत्रात मुलींचा दबदबा वाढताना दिसत आहे. क्रीडा क्षेत्रातही मुलींचा कायम आहे. मेरी कोम, गीता-बबिता भगिनी, सायना नेहवाल, सानिया मिर्झा यांसारख्या असंख्य मुलींनी त्या त्या क्रीडा प्रकारात आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा फडकविला आहे. आता  पॉवरलिफ्टिींगसारख्या अवजड क्रीडा प्रकारात विटाव्यातील एका सामान्य कुटुंबात राहणारी सुष्मिता सुनिल देशमुख ही आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिींग स्पर्धांमध्ये सहभागी होऊन सर्वोत्तम कामगिरी करीत आहे.17 जून 2019 रोजी केरळ येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 46 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकून दुसरं स्थान पटकावलं आहे.  विशेष म्हणजे आगामी कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी तिची निवड भारतीय संघात होणार असल्याचे तिने सांगितले.दुबईतील आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेतही उत्तम कामगिरी बजावली आहे.  सध्या ती गोवेलीतील जीवनदीप कॉलेजमध्ये ए.कॉमच्या दुसर्या वर्षात शिकत आहे. ती कारभारी जिममधून प्रशिक्षण घेत असून प्रशिक्षक विनायक कारभारी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने ही यशाची शिखरे गाठली आहेत.घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही खेळण्याची जिद्द सुष्मिताने सोडली नाही. तिला विटाव्यातील मराठा समाज संघाच्या कार्यकर्त्यांनी देखील आर्थिक मदतीचा हात दिला आहे. तर सुधागड तालक्यातील वाघोशी गाव येेथील रहिवासी असल्याने रहिवासी सेवा संघ, ठाणे, मुंबई, पुणे यांनीदेखील तिला उज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments