Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeकोंकणठाणेयोगी सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसची निदर्शने

योगी सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसची निदर्शने

ठाणे : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पीडितेला ठार मारण्याचा कट करणाऱ्या भाजपा आमदार कुलदीपसिंह सेंगर या आमदारावर कारवाई न करता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाजप सरकार सेंगर यांना पाठीशी घालत असल्याने भाजपा आमदार कुलदीपसिंह सेंगर यालाच आता भाजपा सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेचा दूत नेमावे अशी मागणी करत ठाणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने ठाण्यात आंदोलन करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेचे दहन केले.

महाराष्ट्र युवक काँग्रेसतर्फे या घटनेच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन  करण्यात येत आहे.त्यानुसार ठाणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी ठाण्यात आंदोलन करण्यात आले.महिला सुरक्षेबद्दल खोटा कळवळा दाखवून आपल्याच नेत्यांकडून महिलांवर होणारा अत्याचार मूग गिळून गप्प बघत बसणाऱ्या भाजपा सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला.यावेळी ‘पहले भाजप से बेटी बचाओ फिर बेटी पढाओ’ अशा मेसेजचे फलक झळकावले गेले.तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सरबप्रीत (विनर ) बिंद्रा यांच्या नेतृत्वखाली सदरचे आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हा सरचिटणीस सचिन जैन ,जिल्हा सोशल मीडिया समनव्य जमीर मकवाना व युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. 

४ जून २०१७ रोजी उन्नाव येथील एका अल्पवयीन मुलीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर आणि त्याच्या भावाने बलात्कार केला.इतकेच नाही तर भाजप आमदाराने पीडित मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली.२८ जुलै २०२९ रोजी पीडित मुलगी नातेवाईकांसह कारमधून जात असताना तिच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली.यामध्ये पीडित मुलीची काकी आणि मावशीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पीडित मुलगी गंभीर जखमी झाली.बलात्कारी भाजप आमदारावर कारवाई न करता योगी आदित्यनाथ यांचे भाजप सरकार सेंगर यांना पाठीशी घालत असल्याने देशभर भाजप सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलीसह तिच्या कुटुंबियांना संरक्षण व मदत करण्यात यावी अशी मागणी  ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सरबप्रीत (विनर ) बिंद्रा यांनी यावेळी केली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments