Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीसांची सर्वपक्षीय आमदारांच्या एकत्र फोटोसेशनला दांडी!

देवेंद्र फडणवीसांची सर्वपक्षीय आमदारांच्या एकत्र फोटोसेशनला दांडी!

Maharashtra assembly mlas photosesion

नागपूर :  लोकसभेच्या धर्तीवर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वपक्षीय आमदारांचे एकत्र फोटोसेशन सुरु केले. हिवाळी अधिवेशनादरम्यान आज सर्वपक्षीय आमदारांचं एकत्र फोटोसेशन झालं. विधानभवनाच्या बाहेर सर्वपक्षीय आमदारांनी या फोटोसेशनला हजेरी लावली. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांनी दांडी मारली. नाना पटोले यांनी फडणवीसांचे नाव न घेता आमदारांची झोप झाली नसावी असा टोला लगावला.

सर्वपक्षाचे सर्व आमदार उपस्थित असताना, देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थित राहणं अपेक्षित होतं, मात्र ते फोटोसेशनला आलेच नाहीत. याशिवाय देवेंद्र फडणवीस भाजप आमदार आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार हे फोटोसेशनला न थांबता परतले. कदाचित देवेंद्र फडणवीसांची अनुपस्थिती पाहून ते निघून गेले असावेत अशी चर्चा विधानभवनाबाहेर सुरु होती.

विधानसभा सदस्यांना फोटोसेशनसाठी सूचना दिली होती, पण काही सदस्यांची कदाचित झोपच उघडली नसेल,  झोपेतून उठले नसतील म्हणून काही आमदार आले नाहीत, असं म्हणत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फोटोसेशनसाठी अनुपस्थित आमदारांबाबत नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री वेळ पाळत नाहीत – आशिष शेलार

भाजप आमदार आशिष शेलार हे फोटोसेशनसाठी आले होते, मात्र ते मधूनच निघून गेले. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे वेळेत आले नाहीत, मुख्यमंत्री वेळ पाळत नसल्यामुळे मी फोटोसेशनच्या कार्यक्रमातून निघून गेलो.

 विधानसभेत औचित्याचा मुद्दा…

दरम्यान सभागृहात काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत, आज फोटोसेशनला सर्वांसोबत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले असते तर बरं झालं असतं असं मत व्यक्त केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments