Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रप्रवीण दरेकरांना त्रास दिला तर गोळ्या घालीन?

प्रवीण दरेकरांना त्रास दिला तर गोळ्या घालीन?

Pravin darekarपुणे : गेल्या महिन्यात महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत झालेल्या तोडफोड अन गोंधळात एका कार्यकर्त्यावर चक्क आमदार प्रवीण दरेकर यांना उद्देशून आमच्या नेत्याला त्रास दिल्यास गोळ्या घालीन असे म्हणून पिस्तूल दाखवल्याप्रकरणी बनगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, १५ दिवसांनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित घुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन बनकर यांनी याबाबत तक्रार दिली आहे. 

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या सभागृहामध्ये गेल्या महिन्यात (सोमवारी,19 मार्च) निवडणूक प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी बहुमत आपल्याकडेच असल्याच्या वादातून खुर्च्या आणि टेबल तोडत तुफान गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने सहकार विभागाने निवडणूक प्रक्रिया रद्द केली होती.

भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल आणि संजीव कुसाळकर यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात निवडणूक झाली होती. दरेकर हे या संस्थेच्या मावळत्या कार्यकारिणीचे संचालक आहेत. दोन्ही पॅनेलने आपल्याकडेच बहुमत असल्याचा दावा केल्यावरून हा प्रकार घडला होता.

त्यानंतर याप्रकरणी बनगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार चक्क 15 दिवसांनी पोलिसांकडून अमित घुलेवर आमदार प्रवीण दरेकर यांना उद्देशून आमच्या नेत्याला त्रास दिल्यास अमित यांनी पिस्तूल काढून गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, दबाव टाकून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments