Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादबेरोजगारीच्या प्रश्नावर राष्ट्रवादी युवकचा औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा

बेरोजगारीच्या प्रश्नावर राष्ट्रवादी युवकचा औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा

ठिय्या आंदोलन करत विभागीय आयुक्तांना निवेदन केले सादर

औरंगाबाद -बेरोजगारीच्या प्रश्नावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

नाशिक, पुणे याठिकाणी बेरोजगार युवकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन आंदोलने केल्यानंतर आज युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

युवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलनही केले. त्यानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी औरंगाबाद युवक शहराध्यक्ष दत्ता भांगे, शहर कार्याध्यक्ष कय्युम शेख, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, जिल्हा कार्याध्यक्ष रहिम पटेल आदींसह मोठया संख्येने युवक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments