Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमराठवाडाबीडधनंजय मुंडेंचा परळीत विजयी षटकार, 8 पैकी 6 ग्रामपंचायतीवर कब्जा

धनंजय मुंडेंचा परळीत विजयी षटकार, 8 पैकी 6 ग्रामपंचायतीवर कब्जा

बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या गटानं परळीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. परळी तालुक्यातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये भाजपला दारुण पराभावाला सामोरं जावं लागले आहे. परळी तालुक्यातील 8 पैकी 6 ग्रामपंचायतींवर धनंजय मुंडे यांच्या गटानं विजय मिळवला. परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या गटानं पुन्हा एकदा वर्चस्व दाखवून दिलं आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. परळी तालुक्यातील 8 पैकी 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीनं वर्चस्व मिळवलं आहे. परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. परळी तालुक्यातील 8 पैकी वंजारवाडी, रेवली, सरफराजपूर, मोहा, गडदेवाडी, वंजारवाडी , लाडझरी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीनं विजय मिळवला आहे.

परळी तालुक्यातील रेवली आणि वंजारवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. या दोन्ही ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे गेल्या होत्या. भोपळा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या गटानं विजय मिळवला आहे हे विशेष.

राष्ट्रवादींनं विजय मिळवलेल्या ग्रामपंचायती

1 वंजारवाडी बिनविरोध

2 रेवली बिनविरोध

3 सरफराजपुर

4 मोहा

  1. लाडझरी
  2. गडदेवाडी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments