Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमराठवाडालातूररेणापुर पन्नगेश्वर शुगर मिलचे गोडाऊन चोरट्यांनी फोडले; २८ लाख ४४ हजाराचे साहित्य...

रेणापुर पन्नगेश्वर शुगर मिलचे गोडाऊन चोरट्यांनी फोडले; २८ लाख ४४ हजाराचे साहित्य पळवले

pannageshwar sugar mill thief,renapur ,pannageshwar,sugar mill,theft,latur,millरेणापूर तालुक्यातील मौजे पानगाव येथील पन्नगेश्वर शुगर मिलचे गोडाऊन अज्ञात चोरट्याने फोडले. गोडाऊन मधील सुमारे २८ लाख ४४ हजार रुपयांचे साहित्य पळवण्यात आले. कारखाना कार्यस्थळावर असणारे सीसीटीव्ही कॅमेरेही चोरट्यांनी फोडून टाकले आहेत. या चोरी प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर चोरी प्रकरणी पन्नगेश्वर शुगर मिलमधील स्टोअर किपर अंकुश सखाराम कोल्हापूरे यांनी रेणापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. स्टोअर किपर अंकुश सखाराम कोल्हापुरे यांनी घडलेल्या प्रकरण सांगितले “७ ऑगस्ट रोजी दिवसभर काम करून गेटला कुलूप लाऊन त्यांनी चावी सुरक्षा गेटवर जमा केली होती. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता कारखान्यात कामावर हजर झाल्यानंतर सफाई कामगारांनी गोडाऊनचे शटर वाकडे झाल्याचे सांगितले. शटर उचकटलेले दिसून आल्यामुळे ही बाब त्यांनी सुरक्षा अधिकारी लहाने यांना कळवली. तसेच पोलिसांनाही माहिती कळवण्यात आली. गोडाऊन मध्ये जाऊन पाहणी केली असता गन मेटल बेरींग लायनर ६ नग (किंमत १३०१४५२), गन मेटल बुश ४ नग (किंमत १०९५२२३), कॅमेरा अडेप्टर १ नग (किंमत १२००६), गन मेटल स्केअर बार ३ नग (किंमत ३६९०६४ रुपये), नेट वर्किंग डी लॉक स्वीच १ नग (किंमत ६५००५ रुपये), ओफसी केबल १ नग (किंमत २२०० रुपये) असे साहित्य चोरट्यांनी पळवून नेले. गेटवर सुरक्षा रक्षक तैनात असताना चोरट्यांनी पाठीमागून तार कापून आतमध्ये प्रवेश केला होता. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले होते परंतु त्याचीही मोडतोड करून टाकली. सदर चोरी प्रकरणी रेणापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments