एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग, लाखोंचे नुकसान

- Advertisement -

 रायगड – नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसीमध्ये ओम फोम नावाच्या कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कंपन्यांना आगी लागण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळावर अग्निशमनचे ७ बंब दाखल झाले आहेत. पनवेल महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग घटनास्थळी पोहोचलेला आहे. आग लागलेल्या कंपनीत बेडसाठी वापरल्या जाणार्‍या फोमचे उत्पादन केले जात होते. ज्वलनशील असलेला फोम पाणी शोषून घेत असल्याने टँकर्सची संख्या वाढविण्यात आली आहे. आग कशाने लागलेली आहे, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -