Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेकोरेगाव भीमा दंगल: मिलींद एकबोटे पोलिसांसमोर हजर

कोरेगाव भीमा दंगल: मिलींद एकबोटे पोलिसांसमोर हजर

Milind Ekbote,bhim koregaon,pune,hundu,dalit,sambhaji maharajमहत्वाचे…
१. कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी आरोपी मिलींद एकबोटे आज शिक्रापूर पोलीस स्थानकात हजर
२. ग्रामीण पोलिसांना चार पत्रे पाठवून आपण चौकशीला तयार असल्याचे कळविले होते
३. ग्रामीण पोलिसांनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही


पुणे : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी आरोपी हिंदु एकता आंदोलनाचे प्रमुख व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती प्रमुख व माजी नगरसेवक मिलींद एकबोटे आज २३ फेब्रुवारीला शिक्रापूर पोलीस स्थानकात हजर झाला. शिक्रापूर पोलीस त्याची चौकशी करीत आहेत. अशी माहिती समोर आली.

सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर मिलिंद एकबोटे यांनी ग्रामीण पोलिसांना चार पत्रे पाठवून आपण चौकशीला तयार असल्याचे कळविले होते. परंतु, ग्रामीण पोलिसांनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही किंवा त्यांना चौकशीलाही बोलविले नाही, असे मिलिंद एकबोटेचे वकील महिन प्रधान यांनी सांगितले होते. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़  या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती़  तेथेही अर्ज फेटाळला गेल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले़ सर्वोच्च न्यायालयाने ७ फेब्रुवारीला त्यांना अंतरिम जामीन मंजूर करून त्याची सुनावणी २० फेब्रुवारी रोजी ठेवली होती. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी अंतिम सुनावणी ४ मार्चला ठेवली असून तोपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. दरम्यान मिलींद एकबोटे स्वत: हून पोलीस ठाण्यात हजर झाल्याची चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments