Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमनसे नगरसेविका सुरेखा भोसले यांच निधन

मनसे नगरसेविका सुरेखा भोसले यांच निधन

नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कट्टर समर्थक राहिलेल्या नगरसेविका सुरेखा रमेश भोसले (६३) यांची आज पहाटे कॅन्सरमुळे प्राणज्योत मालवली. भोसले या एकमेव राज समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. सुरेखा भोसले यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मनसेचे माजी आमदार नितीन भोसले हे सुरेखा भोसले यांचे पुतणे आहेत.

नाशिक मनपा निवडणुकीवेळी मनसेचे ४० पैकी तब्बल २७ नगरसेवकांनी मनसेची साथ सोडली. तर अनेक जणांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. तर काहींनी अन्य पक्षांकडून निवडणूक लढवणं पसंत केलं. अशा कठीण प्रसंगी सुरेखा भोसले यांनी पक्षाची साथ सोडली नव्हती. यंदा त्यांनी प्रभाग क्रमांक १३ मधून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. मात्र या निवडणुकीनंतर त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
सुरेखा भोसले यांना घरातूनच राजकीय वारसा मिळाला. त्यांनी १९९७ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेकडून निवडणूक लढवून महापालिकेत प्रवेश केला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०१७ पर्यंतच्या निवडणुकीत त्यांनी चार वेळा नगरसेवकपद भूषवलं आहे. नाशिक मनपातील अनुभवी, अभ्यासू नगरसेविका म्हणून त्या परिचीत होत्या.
गेल्या पंचवार्षिकमध्ये नाशिक मनपात मनसेची सत्ता होती, त्यावेळी त्या सभागृह नेत्या होत्या. याव्यतिरिक्त त्यांनी प्रभाग समिती अध्यक्ष, महिला बाल कल्याण समिती, स्थायी समिती सदस्य म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments