Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रअच्छा फोटो छापना, आकाश अंबानीची फोटोग्राफर्सला विनंती!

अच्छा फोटो छापना, आकाश अंबानीची फोटोग्राफर्सला विनंती!

Akash Ambani, Shloka Mehta, Marraigeमुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि हिरे व्यापारी रसेल मेहता यांची धाकटी मुलगी श्लोका मेहता यंदाच्या वर्षअखेरीस विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांनी अनेक छायाचित्रकारांनी आकाश आणि श्लोकाची एक झलक टीपण्यासाठी गर्दी केली होती. छायाचित्रकारांनी फोटो काढल्यानंतर ते कोणत्या फोटोची निवड करुन बातम्यांसाठी कोणते फोटो वापरणार याचीच बहुधा त्यालाही काळजी असावी. कारण, त्याने छायाचित्रकारांना अच्छा फोटो छापना’, असं सांगितलं. याचीच चर्चा सर्वत्र चालू आहे.

काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. सोशल मीडियावर या नव्या सेलिब्रिटी जोडीच्या साखरपुड्याचे काही फोटोसुद्धा व्हायरल झाले. दोघांच्याही कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडलेल्या साखरपुड्यानंतर अंबानींनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी एका ग्रॅण्ड पार्टीचं आयोजन केलं होतं.

विविध क्षेत्रातील काही प्रसिद्ध व्यक्तींनी या पार्टीला हजेरी लावत आकाश आणि श्लोकाला शुभेच्छा दिल्या. ज्यावेळी या नव्या जोडीने छायाचित्रकारांसाठी पोझही दिली आणि त्याच वेळचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक छायाचित्रकारांनी आकाश आणि श्लोकाची एक झलक टीपण्यासाठी गर्दी केली होती. या दोघांनीही त्यांना नाराज केलं नाही. पण, फोटो काढून झाल्यानंतर पुन्हा पार्टीत जातेवेळी आकाशने एक गोष्ट सर्वच छायाचित्रकारांना सांगितली.

आता इतक्या छायाचित्रकारांनी फोटो काढल्यानंतर ते कोणत्या फोटोची निवड करुन बातम्यांसाठी कोणते फोटो वापरणार याचीच बहुधा त्यालाही काळजी असावी. कारण, त्याने छायाचित्रकारांना ‘अच्छा फोटो छापना’, असं सांगितलं. अर्थात यावेळी छायाचित्रकारांनीही ‘हा सर अच्छा फोटो छापेंगे’, असं म्हटल्याचं या व्हिडिओमधून समोर आलं आहे.
आकाश आणि श्लोकाचं लग्न हे यंदाच्या वर्षातील बहुचर्चित, बहुप्रतिक्षित लग्न ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments