Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईच्या सत्र न्यायालयातील आग अखेर आटोक्यात!

मुंबईच्या सत्र न्यायालयातील आग अखेर आटोक्यात!

महत्वाचे…
१. नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलास यश २. आगीमागचं कारण अस्पष्ट ३. सुदैवानं जीवितहानी टळली


 मुंबई: मुंबई व उपनगरात आगीचे सत्र सुरुच असून आज सकाळी मुंबई सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश  मिळालं आहे.

कर्मवीर भाऊराव मार्गावर मुंबई विद्यापीठाजवळ असलेल्या सत्र न्यायालयात आज सकाळी आग लागली होती. या आगीत कुणीच जखमी झालेलं नाही. ही आग आज सकाळी लागली होती. दरम्यान तातडीने अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली होती. या आगीमागचं कारण अजून कळू शकलेलं नाही. दरम्यान मुंबईमध्ये आग लागण्याच प्रमाण मात्र आता वाढत चाललं आहे. काही दिवसांपूर्वी कमला मिलमध्येही आग लागली होती आणि त्यात तब्बल १४ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता सत्र न्यायालयाचं महत्वाचे कागदपत्र जळाले का हे स्पष्ट झाल नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments