Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत अकरावीची प्रवेश क्षमता ३ लाखांच्यावर वाढवणार

मुंबईत अकरावीची प्रवेश क्षमता ३ लाखांच्यावर वाढवणार

मुंबई: यंदा दहावीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थांसाठी खुशखबर, मुंबई आणि उपनगरांमध्ये नव्या १४ महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये ९ हजार ६७० जागा वाढणार आहेत.
गेल्या वर्षी (२०१७-१८) मुंबईमध्ये अकरावीची प्रवेश क्षमता २ लाख ९२ हजार ९० इतकी होती. यंदा ती ३ लाख १ हजार ७६० इतकी असेल.

मुंबईतील विद्यार्थ्यांचा गेल्या काही वर्षांचा प्रवेशाचा कल पाहता, वाणिज्य (कॉमर्स) शाखेच्या जागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. कॉमर्सच्या ४ हजार ४६० जागा वाढल्या आहेत.

विज्ञान शाखेच्या ३ हजार ७६० जागा तर कला शाखेच्या १ हजार १४० जागा वाढल्या आहेत.

किमान कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रमाच्या (एमसीव्हीसी) ११० जागा वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा एकूण ८०० महविद्यालयात ११ वी विद्यार्थ्यांचे प्रवेश मुंबई विभागसाठी केले जातील.

शाखा       प्रवेश क्षमता           ऑनलाइनप्रवेश
प्रक्रियेसाठी उपलब्ध जागा

कला          ३५,३२०              २०,३२६
वाणिज्य       १,६५,३२०           ७८,०४५
विज्ञान         ९४,७७०             ४२,३२४
एमसीव्हीसी   ६,३४०               ३,८९९

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments