Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईयोगेश्वरी कला क्रीडा महोत्सव पुरस्कार वितरण

योगेश्वरी कला क्रीडा महोत्सव पुरस्कार वितरण

राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या ६० व्या जन्मदिनानिमित्त जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील विविध शाखांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य कला – क्रीडा महोत्सवाचा बक्षिस वितरण समारंभ विधानसभेचे आमदार तसेच उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते श्रमिक विद्यालय येथे पार पडला. यावेळी विधानसभा समन्वयक विश्वनाथ सावंत, महिला विधानसभा संघटक रचना सावंत, शालिनी सावंत, नगरसेवक बाळा नर, उपविभागप्रमुख कैलासनाथ पाठक, विविध शाखांचे शाखाप्रमुख, शिक्षक,विद्यार्थी वर्ग, युवासेनाचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, ट्रॉङ्गी तसेच मेडल देण्यात आले. विधानसभा क्षेत्रात कब्बडी, खो-खो, धावणे, गोळाङ्गेक, लांबउडी, क्रिकेट, सांघिकनृत्य, आदि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments