Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमनोरंजनसेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत

सेलफोन्स मुले माणसे दुरावलीत~ आशाताईंची खंत

रविवारी आशाताई सुदेश भोसले आणि इतर तरुण कलाकारांसोबत बागडोग्राहून कोलकात्याला येत होत्या. यावेळी एका ठिकाणी आशा ताई आणि इतर सगळे विसावा घेत असताना सगळे जण आपल्या स्मार्ट फोनवर बिझी झाले आणि आशाताई मात्र कपाळाला हात लावून सगळ्यांकडे पाहत राहिल्या. या क्षणाचं छायाचित्र कोणीतरी टिपलं. ते छायाचित्र आशाताईंनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केलं आणि त्यासोबत लिहिलं,’ इतके उत्तम सहप्रवासी असूनही गप्पा मारायला मात्र कुणीच नाही. धन्यवाद अलेक्झेंडर ग्रॅहन बेल!

ग्रॅहम बेल या शास्त्रज्ञाने १५० वर्षांपूर्वी पहिल्या टेलिफोनची निर्मिती केली होती. गंमतीची बाब म्हणजे बेलने कधीच टेलिफोनचा वापर केला नाही पण या उपकरणामुळे माणसं मात्र एकामेकांवर दुरावली आहे. माणसांशी बोलण्यापेक्षा स्मार्टफोनमध्ये गढून जाणे लोकांना जास्त आवडत असल्याची खंत आशाताईंनी व्यक्त केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments