Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईपोलिसांनी २० वर्षीय तरुणीला तुरुंगात विवस्त्र करुन मारले!

पोलिसांनी २० वर्षीय तरुणीला तुरुंगात विवस्त्र करुन मारले!

Mumbai, women jailमुंबई – दादर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपाईसह ६ अधिकारी अडचणीत आले आहेत. चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका २० वर्षीय तरुणीने पोलिसांनी तुरुंगात विवस्त्र करून मारहाण केल्याचा आरोप न्यायालयात केला. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहेत.

पीडित तरुणी ही नवी मुंबईतील वाशी परिसरात राहायला आणि मुंबईतील माटुंगा परिसरात घरकाम करते. या २० वर्षीय तरुणीवर ती काम करीत असलेल्या घरातील घरमालकाने ४ लाख रुपयांचे सोण्याचे दागिणे चोरल्याचा आरोप करीत दादर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. सदर घरकाम करणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्याकडून समन्स पाठविण्यात आल्यानंतर आपल्या आईसोबत पीडित तरुणी पोलीस ठाण्यात हजर झाली. तिला दादर पोलिसांनी चौकशीनंतर अटक केली. सदर महिलेची आई दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात गेली असता मुलीला माहीम पोलीस ठाण्याच्या तुरुंगात ठेवल्याचे सांगितले. मात्र पीडित तरुणीला तिच्या आईने दादर पोलीस ठाण्याच्या एका बंद खोलीत पाहिले. यानंतर तुरुंगात विवस्त्र करुन जबर मारहाण केल्याची तक्रार पीडित मुलीने केली. मग मानवाधिकार संघटना आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांकडून भोईवाडा न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली. पीडित मुलीची जेजे रुग्णालयात वैद्यकिय तपासणी केली असता तिला मारहाण केल्याचे निष्पन्न झाले. भोईवाडा न्यायालयाने या संदर्भात तपास अधिकाऱ्यांसह एकूण ५ जणांना न्यायालयात केस डायरीसह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दादर पोलिसांच्या ६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments