Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबईत मतदानकेंद्रांवर 40 हजार पोलिसांचा वॉच!

मुंबईत मतदानकेंद्रांवर 40 हजार पोलिसांचा वॉच!

Mumbai Policeमुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे मतदान सोमवारी 21 ऑक्टोबरला होणार आहे. मुंबईमधील 36 विधानसभेसाठी मतदान होणार आहे. मतदानावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, मतदान सुरळीतरित्या पार पडावं यासाठी संपूर्ण मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 40 हजाराहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
मुंबईत शहरात 522 ठिकाणी 2 हजार 594 मतदान केंद्र आहेत. तर उपनगरात 1046 ठिकाणी 7 हजार 397 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यातील जवळपास 269 मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. दरम्यान आतापर्यंत निवडणूक आचारसंहिता उल्लघंन केल्याप्रकरणी 34 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईत मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी मुंबई पोलिसांच्या सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मुंबईत अतिरिक्त सुरक्षा दलालाही तैनात करण्यात आलं आहे. मुंबईत सीपीएमफच्या 22 कंपन्या, एसआरपीएफच्या 12 कंपन्या आणि 2700 होमगार्डही तैनात असणार आहेत.
मतदान केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात नो पार्किंग लागू करण्यात आली आहे. फोर्स वन, क्यूआरटी, असॉल्ट टीम, दहशतवादविरोधी पथक या सुरक्षा यंत्रणांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहे. तसेच इंटेलिजन्स टीमदेखील मुंबईत ठिकठिकाणी तैनात राहणार आहे. दरम्यान मुंबई पोलिस दलातील 10 हजारांपेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी पोस्टल मत प्रक्रियेद्वारे मतदान करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments