Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबईत कोरोनाचा चौथा रुग्ण सापडला

मुंबईत कोरोनाचा चौथा रुग्ण सापडला

Coronavirus patients in Mumbai, coronavirus, mumbai coronavirus, maharashtra, uddhav thackerayमुंबई : कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. मुंबईसह महाराष्ट्राच विचार केला तर मुंबईत आणखी एक करोनाबाधित रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली आहे. मुंबईत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार झाली असून, राज्यातील हा आकडा १८वर पोहोचला आहे.

करोनाबाधित रुग्ण हा घाटकोपर पूर्वेकडील पेट्रोल पंपावरील कर्मचारी असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई पेट्रोल पंप असोसिएशननं ही माहिती दिली. त्यामुळे मुंबईमध्ये कोरोना पसरत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात करोना विषाणूचा धोका वाढला आहे. राज्यात करोनाबाधितांची संख्या १८वर पोहोचली आहे. दहा रुग्ण हे पुण्यातील आहेत. तर नागपुरात तीन रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. मुंबईत हा आकडा चारवर पोहोचला आहे. घाटकोपरमधील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा चाचणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याचं निष्पन्न झालं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारी म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड येथील व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्य-सिनेमागृहे आज मध्यरात्रीपासून बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. प्रत्येकांनी काळजी घ्यावी असंही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments