Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअभिजीत बिचुकले यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार

अभिजीत बिचुकले यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार

Abhijeet Bichukle's nomination hangs
मुंबई : वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे आदित्य ठाकरेंविरोधात रिंगणात उतरलेले ‘बिग बॉस’ सेलिब्रिटी अभिजीत बिचुकले यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. बिचुकले यांनी दैनिक खर्च नोंदवह्या तपासणीसाठी सादर केल्या नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बिचुकलेंची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियमा अंतर्गत अभिजीत बिचुकले, विश्राम पाडम आणि महेश खांडेकर या तिघा उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

बिचुकलेंसह तिन उमेदवारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम-77 नुसार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटिशीला उमेदवारांनी वेळेत उत्तर दिलं नाही, तर त्यांची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार आयोगाला असतो.

आपण आदित्य ठाकरेंचा पराभव करु असा विश्वास बिचुकले यांनी व्यक्त केला होता. मात्र, आता नोटीस आल्यानंतर त्यांची उमेदवारी अडचणीत येऊ शकते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वरळी मतदारसंघाकडे लागलं आहे. ‘बिग बॉस’मुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले बिचुकलेही या मतदारसंघातून नशीब आजमावत असल्याने अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments