Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईआदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाडांसह दिग्गजांनी भरले उमेदवारी अर्ज

आदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाडांसह दिग्गजांनी भरले उमेदवारी अर्ज

Aaditya Thackeray Dhananjay Munde Jitendra Awhad,Assembly Elections 2019,Aaditya Thackeray,Dhananjay Munde,Jitendra Awhadमुंबई: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेसह, धनंजय मुंडे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरले. राज्यात ठिकठिकाणी उमेदवार शक्तीप्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. उद्या शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

आदीत्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणूक लढणारे ते पहिले ठाकरे ठरले आहेत. तर परळीमधून धनंजय मुंडे आणि त्यांची चुलत बहिण पंकजा मुंडे एकमेकांविरोधात लढणार आहेत. दोघांनाही आज अर्ज दाखल केला. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमधून अर्ज दाखल केला. तर मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केला. आज विविध पक्षांच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करुन आपआपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आजचा दिवसभर अर्ज भरण्याची लगबग सुरु राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments